Thursday, November 23, 2023

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत..

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत म्हणून सरकारचे विशेष अभिनंदन......
🪷श्री. अमायी महालिंगा नाईक🪷
केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता. पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा...

मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली.
 
भटांच्या शेतात मजुरी करायची, आणि घरी आलं की चार पाच वातींचे दिवे घेऊन बोगदा खोदायला निघायचं. कधीकधी हे काम रात्री 9 पर्यंत चालायचं. एक बोगदा 20 मीटर पर्यंत खोदल्यावर कोसळला. मग दुसरा तिसरा करत चार बोगदे कोसळले, पण नाईकांची जिद्द थोडीसुद्धा कोसळली नव्हती.

शेवटी पाचवा बोगदा खोदायला सुरुवात केली. टेकडी आणि पाणी दोघांनीही ह्यांच्यापुढं हार मानली, आणि 35 मीटर खोडल्यावर एक पाण्याचा झरा लागला. सुपारीच्या खोडाचा पाईप सारखा वापर करून ते पाणी घरापर्यंत आणलं. पाणी साठवायला तिथं मोठा हौद तयार केला.

काही वर्षांपूर्वी बघितलेल्या एका वेड्या स्वप्नाच्या शोधात सुरू झालेला प्रवास एकट्यानं केला. लिहिताना किंवा वाचताना जरी हे सगळं एवढं सहज वाटत असलं, तरी नाईक यांनी ऑलम्पिकच्या स्विमिंग पुलापेक्षा दीड पट मोठा बोगदा खोदला होता. सतत आठ वर्षं आणि सुमारे 23000 तास काम करून...

पाण्याची किंमत कळायला प्रत्येकाच्या वाट्याला एवढा संघर्ष का यावा?, असं वाटतं कधीतरी. नाईकांच्या शेतात एक थेंब पाण्याचा अपव्यय होत नाही. पुनर्वापर केला जातो.
आज नाईक यांच्या शेतात 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती आहे, आणि ऊर्जेचा वापर शून्य. 

आज वयाची सत्तरी ओलांडली तरी नाईक शेतातली सगळी कामं आणि कष्ट स्वतः करतात. काल त्यांना कृषी विषयातला पद्मश्री जाहीर झालाय.

शिक्षण, तंत्रज्ञान, जमीन आणि साधनसंपत्ती यांपैकी काहीही नसताना निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यांवर मात करून अशक्य गोष्टी वास्तवात बदलता येतात, त्यांनी सिध्द केलंय.
औद्योगिक महासत्ता होण्याच्या आपण कदाचित जवळ असू; पण कृषिप्रधान देश कृषी महासत्ता होण्यासाठी आपल्या सगळ्यांना नाईकांएवढे नाहीत, पण थोडेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत...                          🌸🌸🌸

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता
 तेव्हा काय होते?

१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
१३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात,
हे पण समजते.🤔
१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.
१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
१६) जिवन जगण्याची नवी उमेद,एक ऊर्जा निर्माण होते.
१७) आयुष्याच्या प्रति संवेदनशील भावना निर्माण होते.
१८) एकमेकांच्या सुख:दुःख ची तीव्रता कळते.
१९) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...!
२०) आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं.

*📖 चला मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया जेणें करून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध बनेल!
#संकलीत

Featured Post

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम          ������������              १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये ...