Thursday, January 28, 2016

मंत्रिमंडळ व संपर्क क्रमांक

1) मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस - मो.9373107881

2) महसूलमंत्री- एकनाथ खडसे-मो.942303667
3) वित्तमंत्री-सुधीर मुनगंटीवार-मो.9822223102
4) शालेय शिक्षण -विनोद तावडे- मो.9821053178
5) गृहनिर्माण- प्रकाश मेहता मो.9821043048
6) सहकार मंत्री- चंद्रकांत पाटील -9422304150
7)ग्रामविकास - पंकजा मुंडे -मो.9604041212
8) आदीवासी विकास- विष्णू सावरा -मो.9422077293
9) अन्न नागरी पुरवठा-गिरीश बापट -मो.9823040400
10) जलसंपदा -गिरीष महाजन-मो.9422292525
11) परिवहन -दिवाकर रावते -मो .9821143576,9421457457
12) ऊद्योग - सुभाष देसाई -मो.9821037040

13) पर्यावरण - रामदास कदम -मो.9821083468
14) सार्वजनिक बांधकाम-एकनाथ शिंदे -मो.9870075567
15) ऊर्जा -चंद्रशेखर बावनकुळे - मो.9860605555
16) पापु, स्वच्छता -बबनराव लोणीकर -मो.9422135404
17) सार्वजनिक आरोग्य -डाॅ दीपक सावंत -9821627600
18) सामाजिक न्याय -राजाराम बडोले -मो.9421803512
---------------------------------------
राज्यमंत्री
------------
1)सामाजिक न्याय -दीलीप कांबळे -मो.9850222491
2)महिला, बालविकास -विद्या ठाकूर-मो.9769138925
3) गृहराज्यमंत्री - राम शिंदे - मो.9423167460
4) सार्वजनिक बांधकाम-विजय देशमुख -मो.9822000089
5) महसूलमंत्री -संजय राठोड -9422166222/9765594111.
6) सहकार - दादाजी भुसे -9422270593
7) जलसंपदा -विजय शिवतरे -9820081817,9689918321.
8) वित्त,ग्रामविकास -दीपक केसरकर-9422096887
9) आदीवासी विकास-राजे अंब्रीशराव अत्राम-9422555678.
10) गृहनिर्माण, ऊच्च.तंत्रशिक्षण -रविंद्र वायकर -9594011111.
11) गृह (शहरे), नगरविकास, साप्र, विधी -रणजित पाटिल-22875930
12) ऊद्योग, खनिकर्म पर्यावरण , सा.बां - प्रवीण पोटे-पाटील-9464441237,9370152208,865017731
--------------------------
‬: 💻सरकारने ऑनलाईन सेवा सुरु केली💻

* प्राप्त:
💻1. जन्म दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=1

💻2. जातीचा दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=4

💻3. टोळी प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=8

💻4. अधिवास प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=5
 
💻5. वाहन चालक परवाना
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=6

💻6. विवाह प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=3

💻7. मृत्यू प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=2

अर्ज करा:
💻1. पॅन कार्ड
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15

💻2. Tan कार्ड
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=3
 
💻3. रेशन कार्ड
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=7

💻4. पासपोर्ट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=2
 
💻5. मतदार याद्या नाव नोंदणे
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=10

नोंदणी:
💻1. जमीन / मालमत्ता
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=9

💻2. वाहन
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=13

💻3. राज्य रोजगार एक्सचेंज
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=12

💻4. नियोक्त्याची म्हणून
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=17

💻5. कंपनी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=19

💻6. .IN डोमेन
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=18

💻7. GOV.IN डोमेन
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=25

चेक / ट्रॅक:
💻1. केंद्र सरकारने गृहनिर्माण यादी स्थिती प्रतीक्षा
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=9

💻2. चोरीला वाहनांची स्थिती
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1

💻3. भूमि अभिलेख
http://www.india.gov.in/landrecords/index.php

💻4. भारतीय न्यायालयांच्या कॉजलिस्ट यादी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7
 
💻5. न्यायालयांच्या निकालांच्या (JUDIS)
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24

💻6. दैनिक कोर्ट ऑर्डर / प्रकरण स्थिती
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21

💻7. भारतीय संसद कायदे
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13

💻8. परिक्षा परिणाम
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16

💻9. स्पीडपोस्ट स्थिती
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10

💻10. ऑनलाइन शेती बाजार भाव
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6

पुस्तक / चित्र / लॉज:
💻1. ऑनलाईन रेल्वे तिकीट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5

💻2. ऑनलाईन तिकिट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=4

💻3. आयकर
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=12

💻4. केंद्रीय दक्षता आयोगाचे तक्रार (CVC हा)
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14

योगदान:
💻1. पंतप्रधान मदत निधी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=11

इतर:
💻इलेक्ट्रॉनिक पत्रे पाठवू
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=20

ग्लोबल नेव्हिगेशन
💻1. नागरिक
http://www.india.gov.in/citizen.php
 
💻2. व्यवसाय (नवीन विंडो मध्ये उघडेल बाह्य वेबसाइट)
http://business.gov.in/

💻3. ओव्हरसीज
http://www.india.gov.in/overseas.php

💻4. सरकार
http://www.india.gov.in/govtphp

💻5. भारत जाणून
http://www.india.gov.in/knowindia.php

💻6. क्षेत्रांमध्ये
http://www.india.gov.in/sector.php

💻7. संचयीका
http://www.india.gov.in/directories.php

💻8. दस्तऐवज
http://www.india.gov.in/documents.php

💻9. अर्ज
http://www.india.gov.in/forms/forms.php

💻10. कायदे
http://www.india.gov.in/govt/acts.php
 
💻11.नियम
http://www.india.gov.in/govt/rules.phpmoo

मित्रांनो MSG पुढे पाठवा... कारण कोणलाही  आवश्यकता भासु शकते.😊😎🏢
🇯‌🇴‌🇧 ‌‌ ‌🇯‌🇴‌🇧 ‌‌ ‌🇯‌🇴‌🇧

तरुणांनो नोकरी शोधताय?

खालिल वेबसाइटव आपल्या योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध आहेत

शोधा १००% नोकरी मिळेल

www.careerbuilder.co.in
www.careerlic.in
www.clickjobs.com
www.placementpoint.com
www.careerpointplacement.com
www.glassdoor.co.in
www.indtherightjob.com
www.employmentguide.com
www.JOBSDB.COM
www.AE.TIMESJOBS.COM
www.NAUKRIGULF.COM
www.NAUKRI.COM
www.GULFTALENT.COM
www.BAYAT.COM
www.MONSTER.COM
www.VELAI.NET
www.CAREESMA.COM
www.SHINE.COM
www.fresherslive.com
www.jobsahead.com
www.BABAJOBS.com
www.WISDOM.COM
www.indeed.co.in
www.sarkarinaukriblog.com
www.jobsindubai.com
www.jobswitch.in
www.jobs.oneindia.com
www.freshersworld.com
www.freejobalert.com
www.recruitmentnews.in
www.firstnaukri.com
www.freshnaukri.com
www.mysarkarinaukri.com
www.freshindiajobs.com
www.freshersopenings.in
www.freshersrecruitment.in
www.chennaifreshersjobs.com
www.govtjobs.allindiajobs.in
www.timesjobs.com
www.naukri.com
www.tngovernmentjobs.in
www.sarkariexam.co.in
www.govtjobs.net.in
www.indgovtjobs.in

Tuesday, January 19, 2016

शालेय अभिलेखे

📙📗शालेय अभिलेखे📗📙

शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –

१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
↔↔↔↔↔↔↔↔

🚀दाखल खारीज रजिस्टर,
🚀 पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
🚀जन्म प्रमाणपत्र फाईल,
🚀 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
🚀विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
🚀टी.सी. फाईल,
🚀टी.सी. जावक रजिस्टर,
🚀निकाल रजिस्टर,
🚀बढती रजिस्टर,
🚀गळती रजिस्टर,
🚀मूल्यमापन नोंदवही,
🚀बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
🚀अपंग विद्यार्थी रजिस्टर NB

↔↔↔↔↔↔↔↔

२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे

📙शिक्षक हजेरी रजिस्टर,
📙पगारपेड रजिस्टर,
📙शिक्षक सुचना रजिस्टर,
📙शिक्षक हलचल रजिस्टर,
📙शिक्षक रजेचे रजिस्टर,
📙शिक्षक रजा अर्ज फाईल,
📙वार्षिक व मासिक नियोजन
      रजिस्टर,
📙मासिक अभ्यासक्रम
📙प्रगतिपत्रक रजि.,
📙पाठ टाचण वही,
📙पगारपत्रक फाईल,
📙मुख्याध्यापकांचे लॉगबुक

↔↔↔↔↔↔↔↔

३) आर्थिक अभिलेखे

💰स.शि.अ. रोकड रजिस्टर,
💰स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
💰स.शि.अ. लेजर रजिस्टर,
💰सादील रोकड रजिस्टर,
💰सादील खर्चाची पावती फाईल,
💰सादील लेजर रजिस्टर,
💰बांधकाम खर्चाची पावती फाईल,
💰बांधकाम रोकड रजिस्टर,
💰बांधकाम लेजर रजिस्टर
💰शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
💰शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
💰धनादेश नोंद रजिस्टर

↔↔↔↔↔↔↔↔

४) शासकीय योजना अभिलेखे

🏪मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
🏪मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
🏪शालेय पोषण आहार रजिस्टर,
🏪उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
🏪उपस्थिती भत्ता देयके फाईल
🏪अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
🏪आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
🏪दत्तक पालक योजना रजिस्टर

↔↔↔↔↔↔↔↔

५) जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)

📚जंगम मालपुस्तिका,
📚सामान्य मालपुस्तिका
      रजिस्टर

↔↔↔↔↔↔↔↔

६) कार्यालयीन इतर अभिलेखे

📓पालक संपर्क रजिस्टर,
📓आरोग्य तपासणी रजिस्टर,
📓आरोग्य तपासणी कार्ड
      फाईल
📓परीक्षा पेपर फाईल

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

अभिलेख जतन कालावधी
अ.क्र.  अभिलेख श्रेणी  अभिलेखाचे नाव  जतन करावयाचा कालावधी

⏰(01)  अ  सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर 
- कायम
⏰(02)  अ  फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही  - कायम

⏰(03)  अ  परिपत्रके, आदेश फाईल  - कायम

⏰(04)  अ  भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही - कायम

⏰(05)  अ  मुख्याध्यापकाचे लॉगबुक  - कायम

⏰(06)  ब  रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान)  -30 वर्षे

⏰(07)  ब  कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती - 30 वर्षे

⏰(08)  ब  विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल  -30 वर्षे

⏰(09)  ब  नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र  -30 वर्षे

⏰(10)  ब  रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)  -30 वर्षे

⏰(11)  ब  विद्यार्थी संचयी नोंदपत्रक  -30 वर्षे

⏰(12)  ब  सेवा पुस्तिका  कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर -2 वर्षे

⏰(13)  क-1  इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे  -10 वर्षे

⏰(14)  क-1  शाळा सोडल्याचे दाखले - 10 वर्षे

⏰(15)  क-1  फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही - 10 वर्षे

⏰(16)  क-1  आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके  -10 वर्षे

⏰(17)  क-1  विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके  -10 वर्षे

⏰(18)  क-1  वसतिगृह खोलीभाडे नोंदवही  -10 वर्षे

⏰(19)  क-1  महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार - 10 वर्षे

⏰(20)  क-1  फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती  -10 वर्षे

⏰(21)  क-1  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत)  -10 वर्षे

⏰(22)  क-2  जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही  -5 वर्षे

⏰(23)  क-2  आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब  -5 वर्षे

⏰(24)  क-2  रोकडवही (शा. पो. आ.)  -5 वर्षे

⏰(25)  क-2  शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही - 5 वर्षे

⏰(26)  ड  सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)  -18 महिने

⏰(27)  ड  शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज - 18 महिने

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

Sunday, January 10, 2016

बोधकथा

1.परफेक्ट

एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,


मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?

फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.

मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.

फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.

मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.

फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).

तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर...

मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद

दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?

मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

तात्पर्य :-

१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.

२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.

३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, वआपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.

2

खेकडा आणि समुद्राची मैत्री

एकदा एक खेकडा समुद्र किनाऱ्यावर खेळत होता. त्याच्या तीरप्या चालीने वाळूवर काही रेखाटत होता. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकत होत्या आणि त्याने मागे सोडलेले त्याचे पदचिन्ह पुसत होत्या.
त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले, "आपण तर मित्र आहोत मग सांग बरे तु असे का केले ? मी मेहनतीने इतकी सुंदर नकाशी केली तु मात्र क्षणात येवून ती पुसली! " हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली तु मेहनतीने सुंदर नकाशी काढली. मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली कारण या किनार्यावर एक कोळी फिरत आहे काही सावज मिळते का हे शोधत आहे. जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने तुला सहज शोधले असते. खरचं माला तुला दुखवायचे नव्हते रे, मला तुला कायमचे गमवायचे हि नव्हते. हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली क्षणाचाही वेळ न दडवता त्याने लाटेची माफी मागीतली.
यालाचं कदाचित खरी मैत्री म्हणातात.
सारे जिवलग मित्र एकमेकांवर असेचं प्रेम करतात.



Once a crab was playing on the shore of the sea. Curvy lines on the sand was drawn by his walk. The waves of the sea were coming ashore, and remove the trail left behind.

The crab asked to the waves, "we are best friends, I has done beautiful sculpt on sand and you just broke it ruthlessly in a moment."

Then she answered sweetly. "You has done beautiful sculpt on sand and i broke it ruthlessly because one fisherman walking on ashore to find some quarry to eat. If fishermen see your footprint then you was easily caught in his hands. I don't want to bother you. i don't want to lose you. Crabs realized his mistake. He apologized wave.

This is true friendship.

3

परीस ( पारस )

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... 
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... 
महिने लोटले... वर्षे सरली.... 
पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... 
आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...
तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... 
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... 
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......

4

यशाचे बीजगणित!

'आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?

'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय,आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले. 

'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. 

आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 

'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.

'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 

'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 

'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 

'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 

'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? 

अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.

'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 

'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. 

''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.

5

इच्छाशक्तीच्या बळावर जगही जिंकता येते

केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव. 

आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता. 

आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली. 

यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले. 

तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले. 

इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये.

सुंदर सुविचार

सुविचार................

१)  गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर. 

२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी पार्थना. 
३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. 
४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. 
५) जे घाईघाईने वर चढू पाहतात 
 ते कोसळतात. 
६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही. 
७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं. 
८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. 
९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते. 
१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते. 
११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते. 
१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही. 
१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. 
१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो. 
१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, पेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे. 
१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते. 
१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल. 
१८) जीवन हा एक पाण्याचा पवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील. 
१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसयाला सांभाळत न्यावं लागतं. 
२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही. 
२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा. 
२२) खोटी टीका करू नका, नाहीतर पतिटीका ऐकावी लागेल. 
2३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द. 
२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करने कधी चुकवत नाही की फसवत नाही. 
२५) ह्रदयात अपार पेम असंल की सर्वत्र मित्र
२६) टीका करणाया शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाया मित्रांपासून सावध रहा. 
२७) पसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. 
२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य. 
२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो. 
३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. 
३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये. 
३२) शत्रूशीही पेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही. 
३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको. 
३५) दुसयाचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो. 
३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते. 
३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं. 
३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे. 
३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ।। 
४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते. 
४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही. 
४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रिनष्ठा निर्माण करायला हवी. 
४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. 
४४) असंभवनीय गोष्टी कधीच खया मानू नयेत. 
४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र. 
४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये. 
४७) जे दुसयाचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही. 
४८) पुस्तकाइतका पांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही. 
४९) मनाला आंनद, संस्कार देणारी पत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे. 
५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. 
५१) आकाशाखाली झोपणायाला कोण लुटणार ? 
५२) जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही. 
५३) पिंजयात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. 
५४) आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. 
५५) अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे. 
५६) मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो. 
५७) नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा. 
५८) अंतर्बाह्य पांजळपणा हाच पीतीचा पाण होय. 
५९) सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे. 
६०) शहाणपणाचे पदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
६१) गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो. 
६२) दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. 
६३) पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. 
६४) पुढे मिळणाया आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह ! 
६५) स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणायांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही. 
६६) अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव. 
६७) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो. 
६८) स्वधर्माविषयी पेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म. 
६९) अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप ! 
७०) क्रोध माणसाला पशू बनवतो. 
७१) आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. 
७२) आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको. 
७३) जे नंतर चांगले 
 वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
७४) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून पील्यास तो कमी कडू लागतो. 
७५) परमेश्वर खरया भावनेलाच साहाय्य करतो. 
७६) भरणाया जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये. 
७७) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म. 
७८) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी. 
७९) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. 
८०) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
८१) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. 
८२) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका. 
८३) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं. 
८४) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार ! 
८५) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. 
८६) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत. 
८७) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात. 
८८) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते. 
८९) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. 
९०) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. 
९१) आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे. 
९२) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो. 
९३) अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. 
९४) तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसयाचे मित्र बना . 
९५) न मागता देतो तोच खरा दानी. 
९६) चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. 
९७) केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो. 
९८) समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही 
९९) भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले. 
१००) दुसयाला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

नमुना इंग्रजी परिपाठ

🌷 नमुना इंग्रजी परिपाठ 🌷

👉Today is monday And date is 13 july 2015👈
Now Kiran will present today's Paripath
Kiran :- Attention
please !
Relax please !
Attention please !
Good morning , I am Kiran !
now I am going to present Today's Paripath.
Kiran :- Now ready for National antham !
1.....2....3.....Start !
👉National Anthem 👈
Jana-Gana-Mana-Adhinayaka,Jaya He
Bharata-Bhagya-Vidhata
Punjab-Sindhu-Gujarata-Maratha
Dravida-Utkala-Banga
Vindhya-Himachala-Yamuna-Ganga
Uchchhala-JaladthaTaranga
Tava Subha Name Jage
Tava Subha Ashisa Mage
Gahe Tava Jaya Gatha.
Jana-Gana-Mangala Dayaka, Jaya He
Bharata-Bhagya-Vidhata,
Jaya He, Jaya He, Jaya He,
Jaya, Jaya, Jaya,Jaya he .

Kiran :- Now , Rohit will present our Pledge !
Rohit:-good morning , I am Rohit ,now I am going to present our pledge !
👉Our Pledge👈
India is my country
all Indians are my brothers and sisters.
I love my country and
I am proud of its rich and varied heritage.
I shall always strive to be worthy of it.
I shall give respect to my parents,
teachers and elders and treat everyone with courtesy.
To my country and my people,
I pledge my devotion.
In their well being and prosperity
alone, lies my happiness.

Kiran :- thanks Rohit !
Now ,Dishant will present our constitution of India !
Dishant:-Good morning ,I am Dishant ,now I am going to present our constitution of India !
👉The Constitution of India .👈
   🔹Preamble🔹
WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;
EQUALITY of status and of opportunity;  and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of theNation;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

Kiran :- thanks Dishant!

Kiran :- Now sit down please !
Now ready for prayer ! 1....2....3....start.

👉Prayer👈
O god
Bless all with
Health and wealth
Bless all with
Money and harmony
Bless all with
Peace and bliss
Bless all with
Wisdom.

Kiran :- Now ,Sakshi will present Today's good thought !
Sakshi:-Good morning ,I am Sakshi , I am going to present todays good thought !

🌷Todays good thought 🌷
01. Best frinds make the good times better and the hard times easier.
02. Life is no answer but have many questions.
Kiran :- thanks Sakshi !
Kiran :- Now ,Tejas will present today's general knowledge !
Tejas:-Good morning ,I am Tejas ,I am going to present today's general knowledge !

hon.Vinodji Tawde is our education minister of maharashtra .
hon.Sanjay Rathod is our palak mantri of yavatmal dist.
hon.dr. Suchitatai patekar is our education officer.

Kiran :- thanks ,Tejas !
Kiran:-Now , Aarti will present today's importance of the day's !
Aarti:-Good morning , I am Aarti , I am going to present today's importance of the day's !

🌷Highlite days🌷
01. 1973 – Alexander Butterfield reveals the existence of the “Nixon tapes” to the special Senate committee investigating the Watergate break in.
02. 1977 – Somalia declares war on Ethiopia, starting the Ethiopian-Somali War.
03. 2013 – George Zimmerman is found not guilty in the shooting of Trayvon Martin

Kiran:- thanks Aarti !
Kiran :- Now ,Srushti will present today's moral story !
Srushti:-Good morning ,I am Srushti ,I am going to present today's moral story !

🌷Story of the day🌷
The Ass And The Bull
Once, a farmer had a bull and an ass; the bull to work in the fields and the ass to carry the farmer to the market. The farmer would feed the bull with lots of hay and straw as he had to do all the hard work. Due to this, the ass had become envious of the bull. One night, he thought,”If the bull shirks his work, he will definitely get athrashing from the farmer.”So, the ass said the bull,” Tch, tch! How hard is your life, friend! Why don’t you pretend to be ill and take rest tomorrow?” Now the farmer chanced to hear all this. In the morning when the bull pretended tobe ill, the farmer said,” Fine, dear bull! You take rest. Today, I shall take the ass to work in the fields.” And then the ass was made to pull the heavy plough. He go rightly punished for being crafty.

Kiran :- thanks Srushti!
Kiran :- Now , we shall sing all together , we shall over come !
Kiran :- 1....2...3....start.
👉“We Shall Overcome” 👈

We shall over come,
we shall overcome,
We shall overcome someday.
Oh, deep in my heart,
I do believe,
We shall overcome someday.
The truth will make us free,
the truth will make us free,
The truth will make us free someday,
Oh, deep in my heart,
I do believe,
We shall overcome someday.
We’ll walk hand in hand,
we’ll walk hand in hand,
We’ll walk hand in hand
someday.
Oh, deep in my heart,
I do believe,
We shall overcome someday.
We are not afraid,
we are not afraid,
We are not afraid today.
Oh, deep in my heart,
I do believe,
We shall overcome someday.
The truth will make us free,
the truth will make us free,
The truth will make

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम
         ������������             

१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजुन घेणे.म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.
वाचनपुर्वतयारी

१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह

उपक्रम ��

१)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्‍या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा.
मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.

२)वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस

३)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा.चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

४) दहा शब्द झाले की वाक्यवाचन सुरु करावे.हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे.नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.

��अक्षरपरिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा.आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा.आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.

    अक्षरदृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.

      ��स्वरचिन्हपरिचय��
पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षरपरिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.
 
     ��वाक्यवाचन��
मुले शब्द तयार करु लागली की छैट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत.प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत.मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.

��जोडाक्षराचे वाचन��
एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.र चे चार प्रकार शिकवणे.
परिच्छेद आकलन
दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
प्रकटवाचन��
योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा.शिक्षकांमागोमाग एकएक वाक्य विद्यार्थी वाचतील.पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.
परिच्छेदवाचन शब्दडोंगर वाचन घेणे.अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.

  रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवत आहेत .

   मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे,.

Featured Post

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम          ������������              १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये ...