करूया संरक्षण 'ओझोनचे
================ *करूया संरक्षण 'ओझोनचे '* ================ *आपण काय करू शकतो*. 1. सामान्य माणसे सुद्धा ओझोन थराच्या संरक्षणासाठी मदत करू शकतात. त्यासाठी खाजगी वाहना ऐवजी शक्य तेव्हा सार्वजनिक वाहने,सायकल वापरा ,पायी चाला. 2. घरात साफसफाईसाठी विष विरहित व नैसर्गिक पदार्थ वापरायचा आग्रह धरा. 3. शक्यतो स्थानिक भागात विकणारा भाजीपाला, फळे खा. 4. घरातले देखभाल दुरुस्ती वेळोवेळी केली जाते आहे का, हे आई- बाबांच्या लक्षात आणून द्या. *ओझोन वायू नसता तर?* पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या थरात- म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १२ ते ३५ किलोमीटर उंचीवर ओझोन वायू प्रामुख्याने आढळतो. ओझोनच्या रेणूमध्ये प्राणवायूचे ३ अणू सामावलेले असतात. ओझोनच्या पातळ थराला 'पृथ्वीचे संरक्षक कवच' म्हणतात. सूर्याच्या किरणांमध्ये अतिनील किरणे असतात. ओझोनच्या थरात जवळपास ९७ ते ९९ टक्के अतिनील किरणे शोषली जातात. ओझोनचा थर अस्तित्वातच नसता, तर सर्व अतिनील किरणे सूर्यप्रकाशासह थेट पृथ्वीवर पोहोचली असती. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले असते. रोग...