Posts

Showing posts from 2024

करूया संरक्षण 'ओझोनचे

Image
================    *करूया संरक्षण 'ओझोनचे '*  ================  *आपण काय करू शकतो*. 1. सामान्य माणसे सुद्धा ओझोन थराच्या संरक्षणासाठी मदत करू शकतात. त्यासाठी खाजगी वाहना ऐवजी शक्य तेव्हा सार्वजनिक वाहने,सायकल वापरा ,पायी चाला. 2. घरात साफसफाईसाठी विष विरहित व नैसर्गिक पदार्थ वापरायचा आग्रह धरा. 3. शक्यतो स्थानिक भागात विकणारा भाजीपाला, फळे खा. 4. घरातले देखभाल दुरुस्ती वेळोवेळी केली जाते आहे का, हे आई- बाबांच्या लक्षात आणून द्या.  *ओझोन वायू नसता तर?* पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या थरात- म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १२ ते ३५ किलोमीटर उंचीवर ओझोन वायू प्रामुख्याने आढळतो. ओझोनच्या रेणूमध्ये प्राणवायूचे ३ अणू सामावलेले असतात. ओझोनच्या पातळ थराला 'पृथ्वीचे संरक्षक कवच' म्हणतात. सूर्याच्या किरणांमध्ये अतिनील किरणे असतात. ओझोनच्या थरात जवळपास ९७ ते ९९ टक्के अतिनील किरणे शोषली जातात. ओझोनचा थर अस्तित्वातच नसता, तर सर्व अतिनील किरणे सूर्यप्रकाशासह थेट पृथ्वीवर पोहोचली असती. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले असते. रोग...

तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?

Image
*तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?*        सतत आदळ-आपट, नाकावर राग, हट्टीपणा आणि भयंकर संताप, मुलांच्या वागण्यात हे येतं कुठून?        ✒️ *ठळक मुद्दे*  राग येण्याची कारणं समजून घेतली आणि त्यावर योग्य उपाययोजना केली तर मुलांचा राग नियंत्रणात आणता येईल.        *डॉ. श्रुती पानसे(मेंदू विकास अभ्यास तज्ज्ञ आणि समुपदेशक)*  मोठ्या माणसांनी रागवायचं आणि मुलांनी ते ऐकायचं, हेच खरं तर आपल्या समाजाचं वळण; पण आता हे चित्र उलटं दिसायला लागलं आहे.काही घरांमध्ये आईबाबा मुलांच्या सर्वच गोष्टी हातात घेतात. मुलं लहान असताना, साधारण चौथी-पाचवीत जाईपर्यंत मुलांचे निर्णय आई-बाबाच घेत असतात. अनेक घरांत हे पुढेही सुरू राहतं आणि आई-बाबा आणि मुलं यांच्यात एक संघर्ष निर्माण होतो. ते मुलांचा राग-संताप यातून बाहेर पडण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं दिसतं.प्रश्न असा आहे की, काही घरांमध्ये असं वातावरण अजिबातच नसतं. आई- बाबा मुलांच्या मनाची खूप काळजी घेतात. त्यांना वाईट वाटेल असं वागत नाही. यासाठी शाळेची निवडसुद्धा ...

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द! चुकणारे शब्द – बरोबर शब्द स्त्रि – स्त्री – स्त्रियांना (अनेकवचन) तथापी – तथापि परंतू – परंतु आर्शिवाद, आशिर्वाद – आशीर्वाद दिपावली – दीपावली हार्दीक – हार्दिक मैत्रिण – मैत्रीण (एकवचन), मैत्रिणी (अनेकवचन) जाणिव – जाणीव (एकवचन), जाणिवा (अनेकवचन) उणिव – उणीव (एकवचन) उणिवा(अनेकवचन) पारंपारीक, पारंपारिक – पारंपरिक तिर्थप्रसाद – तीर्थप्रसाद शिबीर – शिबिर शिर्षक – शीर्षक मंदीर – मंदिर कंदिल – कंदील स्विकार – स्वीकार दिड – दीड परिक्षा – परीक्षा सुरवात – सुरुवात सुचना – सूचना कुटूंब – कुटुंब मध्यंतर – मध्यांतर कोट्याधिश – कोट्यधीश विद्यापिठ – विद्यापीठ विशिष्ठ – विशिष्ट अंध:कार – अंधकार अंधःश्रद्ध – अंधश्रद्धा आगतिक – अगतिक मतितार्थ – मथितार्थ अणीबाणी – आणीबाणी अल्पोपहार – अल्पोपाहार कोट्यावधी – कोट्यवधी तत्व – तत्त्व – महत्व – महत्त्व व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्त्व उध्वस्त – उद्ध्वस्त चातुर्मास- चतुर्मास निघृण- निर्घृण मनस्थिती- मनःस्थिती पुनर्स्थापना- पुनःस्थापना मनःस्ताप – मनस्ताप तात्काळ – तत्काळ सहाय्य, सहाय्यक – साह्य, सहायक शुभाशिर्वाद – शुभाशीर...