ब्लॉग कसा तयार करावा

ब्लॉग तयार करण्यसाठी अनेक फ्री वेबसाईट आहेत. त्यातील ब्लॉगर (Blogger.com) वर आपण ब्लॉग बनवायला शिकणार आहोत. यासाठी तुमच्याकडे जीमेलचा इमेल अ‍ॅड्रेस असावा लागतो. 

१) तुम्ही आधी जी मेल लॉग-इन करुन इनबॉक्स मध्ये जा.


२) मग उजवीकडील कोपर्‍यात असणार्‍या बॉक्सच्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्या लिस्टमधून ब्लॉगरचे ऑप्शन निवडून त्यात क्लिक करा. 

३) एका नवीन विंडॊ मध्ये ब्लॉगरचा डॅशबोर्ड ओपन होईल. याच बरोबर तुम्ही थेट ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) ला जाऊन जीमेलच्या आयडी पासवर्डने लॉग-इन करुन देखील डॅशबोर्डवर जाऊ शकता.


५) डॅशबोर्डवर तुम्हाला "न्यू ब्लॉग" (New Blog) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही कितीही ब्लॉग एका आय डीवरुन करु शकता. इथे मी आधीच एक टेस्ट ब्लॉग केलेला ही दिसत आहे. 

६) आता एक छोटी नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ब्लॉगचे टायटल (नाव) व अ‍ॅड्रेस (युआरएल) विचारेल. 

आपण हे आधीच ठरविलेले आहे. त्यामुळे ते तिथे भरावे. ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर वेरिफाय करेल आणि जर तसा दुसरा कोणताही पत्ता आधीच असेल तर तशी सुचना तुम्हाला मिळेल व तुम्हाला युआरएल थोडी बदलून टाकावी लागेल. ही माहीती नंतर बदलता ही येते पण शक्यतो बदलू नये त्यामुळे विचारपूर्वक निवड करावी. मग खालच्या विंडॊमधील कोणतेही एक टेंपलेट निवडावे. टेंपलेट म्हणजे तुमचा ब्लॉगचे सर्वसाधारण डिझाईन. त्याचे काही तयार पर्याय ब्लॉगर आपल्याला देतो. त्यात आपण आपल्याला हवा तसा बदल देखील करु शकतो. 
शेवटी क्रीएट ब्लॉगवर क्लिक करावे. 


७) आता तुम्ही ब्लॉगच्या ओव्हर व्हू या पेजवर याल.

 तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे. या पेजवर तुम्हाला सर्वच ऑप्शन दिसतील. येथील वरील व्ह्य़ू ब्लॉग या पर्यायावर क्लिक करुन तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.


८) हा पहा तुमचा ब्लॉग. तुमच्या ब्लॉगच्या युआरएलवर हा ब्लॉग असा दिसेल. यातील क्रमांकाचे विवरण पाहू
१. हेडरबार (ब्लॉगचे नाव/मथळा)
२. पोस्ट एरिया 
३. गॅझेट एरिया
४. बॅकग्राऊंड 
५. फुटर
ब्लॉगच्या तिसर्‍या भागात आपण ब्लॉग पोस्ट एडीटरची ओळख करून घेऊया. 


आपल्या ब्लॉगच्या डॅशबोर्डवर ब्लॉगच्या नावासमोर "क्रीएट न्यू पोस्ट" (१) हे बटन दिसते.
यावर क्लिक करुन आपण ब्लॉग एडीटरमध्ये जाऊ शकतो. त्यापुढे असलेली बटन्स पुढील प्रमाणे आहेत.
(२) पोस्ट लिस्ट - येथे तुम्हाला तुम्ही टाकलेल्या सर्व पोस्टची यादी दिसते. त्याला लागूनच असलेल्या ड्रापडाऊन (३) लिस्टमध्ये ब्लॉग सेटींग्सचे इतर ऑप्शन्स दिसतात. 
(४) व्ह्यू ब्लॉग - याचा वापर करुन आपला ब्लॉग प्रत्यक्षात कसा दिसतो ते आपण पाहू शकतो. 
त्याखाली असलेल्या ओळीमध्ये आपल्याला टोटल ब्लॉग व्ह्य़ू, पोस्टची एकूण संख्या, ब्लॉगच्या फॉलोवर्सची संख्या दिसते. (५)
आता आपण ब्लॉग पोस्ट एडीटरची ओळख करुन घेऊ. यासाठी सर्वात पहिल्या दाखविलेल्या "क्रीएट न्यू पोस्ट" च्या बटनवर क्लिक करु.
आता इथे वरच्या बाजूस डावीकडून पाहण्यास सुरुवात करु. (आकडे फॉलो करावेत)
१. ब्लॉगचे तुम्ही दिलेले नाव
२. पोस्टचे टायटल - पोस्टचे टायटल अथवा मथळा तुम्हाला इथे द्यावा लागतो.
३. कंपोझ/एचटीएमएल - हे दोन प्रकारचे एडीटर आहेत. या ऑप्शनचा वापर करुन तुम्हाला पोस्ट ही कोडींगच्या अर्थात एचटीएमएल या इंटरनेटच्या भाषेतून टाकायची आहे की सोप्प्या पद्धतीने म्हणजे आपण ई मेल कसे लिहतो त्या पद्धतीने टाकायची आहे हे ठरविता येते. आपण सारे बाय डिफॉल्ट कंपोझ हाच ऑप्शन वापरतो. ज्यासाठी कोणतेही कोडींग माहीती असणे आवश्यक नाही. पण जर एचटीएमएल माहित असेल तुम्ही याचा वापर करुन नवनवीन प्रयोग करु शकता.

त्यापुढे तुम्हाला एडीटरचे ऑप्शन्स दिसतील.
४. रिडू आणि अन्डू - म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्या आधीची गोष्ट हवी असेल किंवा पुढची गोष्ट हवी असेल तर या ऑप्श्नसचा वापर तुम्ही करु शकता. 
५. फॉन्टस - इथे ब्लॉगर तुम्हाला काही फॉण्टस देतो. त्याचा वापर तुम्ही करु शकता.
६. फॉन्टसाईज - तुम्ही येथून फॉन्टसाईज चेंज करु शकता. 
७. फॉर्मेट - फॉंटचा फॉरमॅट काय आहे हे तुम्ही येथून ठरवू शकता. म्हणजे मथळा (टायटल) आहे की उपमथळा आहे की साधारण टेक्स आहे.
८ बोल्ड, इटालिक, अंडरलाईन, स्ट्राईकथ्रु (काट मारणे)
९. शब्दांचा रंग बदलणे
१०. शब्दांचा बॅकग्राऊंड बदलणे (अर्थात हायलाईट करणे)
११. हायपर लिंक देण्यासाठीचे ऑप्शन
१२ फोटॊ अ‍ॅड करण्यासाठीचे ऑप्शन
१३. व्हिडीओ अ‍ॅड करण्यासाठीचे ऑप्शन
१४. पेज ब्रेक - याचा वापर पुढे प्रत्यक्ष करुन दाखविणार आहे.
१५. टेक्स अलाईंटमेंट - अर्थात वाक्ये किंवा शब्द कोणत्या बाजूस हवा आहे (डावीकडे, उजवीकडे, मधोमध की सर्वत्र समानपणे) हे ठरविता येते.
१६. बुलेटस ऑप्शन्स
१७. कोट (उद्‍गार) - एखादे उद्‍गार आपल्या लेखात असेल तर याचा वापर करुन आपण ते हायलाईट करु शकतो. 
१८. रिमुव्ह फॉरमॅटींग - कधी कधी तुम्हाला केलेले फॉरमॅटींग काढायचे असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करु शकता. तेवढा भाग निवडून रिमुव्ह फॉरमॅटींग करावे.
१९. स्पेलिंग चेक - इंग्रजी स्पेलिंग चेक साठी याचा चांगला वापर होतो. 
२०.  भाषा - तुम्ही ब्लॉगवर १९ भाषांमधून लिहू शकता. तुम्हाला हवी ती भाषा निवडण्यासाठी या ऑप्शनचा वापर करावा.
२१.  लेफ्ट टू राईट , राईट टू लेफ्ट - याचा वापर सगळी माहीती डावी कडून उजवीकडे व उजवी कडून डावी कडे हलविण्यासाठी होतो.
२२. आता खाली जो मोकळा भाग आहे तिथे आपल्याला आपले सारे कंटेन अर्थात माहिती, फोटो, व्हीडीओ टाकायचे असते.

आता आपण उजवीकडील ऑप्शनची माहि्ती घेऊ.
२३. पब्लिश - तुमची संपूर्ण तयार असलेली पोस्ट या बटनाचा वापर करुन प्रकाशीत करता येते.
२४. सेव्ह - जर तुम्हाला पोस्ट लगेच प्रकाशित करायची नसेल तर ती सेव्ह हे ऑप्शन वापरुन ड्राफ्टमध्ये जतन करता येते.
२५. प्रिव्ह्यू - तुमची पोस्ट कशी दिसणार आहे हे प्रकाशीत करण्याआधी पाहायचे असेल तर या ऑप्शनचा वापर करावा,
२६. क्लोझ - काहीही सेव्ह न करता पोस्ट एडीटर बंद होते.

पोस्ट सेटींग्स
२७. लेब्लल्स - तुम्हाला पोस्टला विविध भागात संग्रहीत करायची असेल तर या लेबल्सचा वापर करता येतो. म्हणजे जर फोटोग्राफी संदर्भात पोस्ट असेल तर आपण फोटॊग्राफी हे लेबल वापरल्यास त्या लेबलची एक कायम स्वरुपी लिंक तयार होते. व ज्या ज्या पोस्टना फोटोग्राफी हे लेबल असेल त्या सर्व पोस्ट एकाच लिंकवर एकाखाली एक दिसतात. त्यामुळे लेबलींग ही काळजीपूर्वक करावी. पोस्टचे वर्गीकरण लेबल्सच्या माध्यमातून उत्तम करता येते.
२८. शेड्युल - म्हणजे ही पोस्ट तुम्हाला ज्या वेळेला प्रकाशीत करायची आहे ती तारिख अथवा टायमिंग तुम्हाला आगाऊ ठरविता येते. अथवा नंतरही ठरवता येते. जर हे ऑप्शन वापरले नाही तर पोस्ट ज्यावेळेला तुम्ही प्रकाशीत करता ती वेळ आणि तारिख आपोआप त्या पोस्टसाठी नोंद होते.
२९. लिंक्स - जेव्ह तुम्ही पोस्ट टायटल टाकता तेव्हा ते टायटल आपोआप लिंकसाठी घेतले जाते. पण तुम्हाला हवी तशी लिंक घेण्यासाचे स्वातंत्र्य यात मिळते. याचा वापरही पुढे पाहणार आहोत. जेव्हा तुमचे टायटल मराठी किंवा इतर भाषेत असेलतर कस्टम परमालिंकचा वापर करुन हवी तो शब्द घ्यायला विसरु नका. 
३०. लोकेशन - एखाद्या पोस्टला लोकेशन अर्थात स्थळ द्यायचे असेल तर गुगल मॅप्सच्या सहाय्याने आपण ते इथे देऊ शकतो.
३१.  सर्च डिस्रिप्शन - पोस्ट शोधण्यासाठी सोप्पे जावे म्हणून इथे आपण पोस्ट बद्दल संशिप्त माहिती अथवा शब्द देऊ शकतो.
३२. ऑप्शन्स व कस्टम रोबोट्स टॅग्स - इथे इतर काही ऑप्शन्स आहेत. त्याचा सविस्तर वापर आपण नंतर पाहू. सध्या त्याची आवश्य़कता नाही त्यासाठी आपल्याला थोड्या वेगळ्या विषयाने पुढे जावे लागेल. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जीवन कौशल्ये शिक्षण

मंत्रिमंडळ व संपर्क क्रमांक

नमुना इंग्रजी परिपाठ