ऍण्टी बायोटिक्स म्हणजे काय?
ऍण्टी बायोटिक्स म्हणजे काय?
डॉ. राजेंद्र एस. गांधी
एखादा चिवट आजार निपटून काढण्यासाठी ऍण्टी बायोटिक्सची मदत घ्यावीच लागते. काय असतात ही ऍण्टी बायोटिक्स.?
आजारपण आलं की डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेणं हे प्रत्येकजणच करतो. करावंच लागतं. बऱयाचदा या औषधांमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असतो. प्रतिजैविकं म्हणजे ऍण्टी बायोटिक्स. एखादा आजार चिवटपणे हलत नसला की ऍण्टी बायोटिक्सचा आधार घ्यावाच लागतो.
ऍण्टी बायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके. म्हणजेच काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म जंतू, विषाणू. आपल्या शरीरातील अणुजीव ते नष्ट करतात. माणसाला जे विकार होतात ते या विषाणूंमुळेच होतात. काहीवेळा विषाणू कमजोर पडल्याने आजार बराही होतो. मग कोर्स पुरा करण्याआधीच को थांबवला जातो. पण शरीरातील विषाणू पूर्णपणे नष्ट झालेले नसतात. ते पुन्हा काही काळाने डोके वर काढतात. यावेळी त्यांची लढण्याची शक्ती वाढलेली असते. म्हणूनच पूर्वी अखेरचा उपाय म्हणून दिली जाणारी ऍण्टी बायोटिक्स आता लगेचच दिली-घेतली जातात.
विषाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ऍण्टी बायोटिक्सचा विशिष्ट कोर्स करावा लागतो. एकदा तो सुरू केला की मध्येच बंद करायचा नसतो. कारण त्यामुळे विषाणू पुन्हा कार्यरत होतात. कोर्स सुरू असताना काही विषाणू मरतात, पण कोर्स मध्येच बंद केल्यास उरलेले विषाणू नष्ट होत नाहीत.
ऍण्टी बायोटिक्सचे दुष्परिणामही असतात. अर्थात सगळ्याच ऍण्टी बायोटिक्स गोळ्यांचा दुष्परिणाम होतो असंही नाही. - डॉ. राजेंद्र एस. गांधी
हेल्पलाइन -
जनरल फिजिशियन्स
डॉ. राजेंद्र एस. गांधी, दादर - (91)-22-24225103
डॉ. भास्कर माखेचा, जुहू - (91)-22-38522566
हायवे हॉस्पिटल, ठाणे - (91)-22-69995952
डॉ. बाखले क्लिनिक, चेंबूर - (91)-22-38592902
डॉ. विजय दहिफळे, नेरूळ - (91)-22-38598781
जियो जी भरके.
ठरावीक वेळी आणि ठरावीक तेवढाच आहार घेतला पाहिजे. जेवणही चांगले आणि पौष्टिक असेल तर त्यामुळे प्रकृती ठणठणीत राहील. मग ऍण्टी बायोटिक्स घेण्याची वेळच येणार नाही. बाहेरचे खाद्यपदार्थ खायचे टाळायलाच हवे.
आपला दिनक्रम संतुलित ठेवायला हवा. त्याचा प्रभाव आरोग्यावर होतोच. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभराचा शेडय़ुल आखून घ्यायला हवा. रोज सकाळी हलकासा व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक घेतला पाहिजे. मग कशाला ऍण्टी बायोटिक्स लागणार?
ऋतूनुसार फळे, भाज्या खाणे आरोग्यदायी असते. जसा मौसम असेल तसं खाणं-पिणं, राहणीमान, योगासने यांच्यात बदल करायचा असतो. जास्त काळ कोल्ड स्टोरेजमध्ये असलेले पदार्थ खाणे टाळायचे. मग कोणताही विकार होत नाही. मग ऍण्टी बायोटिक्स घेण्याची वेळ येत नाही.
हेल्दी लाइफ जगायची तर योगासनांशिवाय पर्याय नाही. योगासने केल्यामुळे शरीर फिट आणि फाइन राहू शकते. त्यामुळे विकार शरीराला शिवत नाही. मग गोळ्या दूर ठेवता येतात.
नेहमी सकारात्मक विचार करायचा. त्यामुळे मन शांत राहाते आणि तणावासारख्या विकारांना बाजूला ठेवता येते. कधीही एकांतात जास्त काळ राहायचे नाही. कारण रिकाम्या मनात वाईट विचारच जास्त येत असतात. मित्रमंडळींमध्ये राहायचे.
हसणारा माणूस सर्वांनाच आवडतो. त्याच्याशी बोलायला सगळ्यांना बरे वाटते. त्यामुळे ओळखी वाढतात, मैत्री वाढते. मग गुंतून राहायला सोपे जाते. यामुळे आजारपणाचे विचारही शिवत नाहीत. मग ऍण्टी बायोटिक्सही दोन हात लांब ठेवता येतात.
अतिरेकाने होणारा प्रभाव
अंग दुखायला लागलं तर चटकन मेडिकलमधून ब्रुफेन आणतात. पण या गोळ्यांच्या अतिरेकाने गॅस्ट्रायसिस होऊ शकतो. किडनी किंवा लिव्हर फेल होऊ शकते. याप्रमाणेच मेट्राजिलमुळे कॅन्सर वा पेरीफेरल न्यूरोपॅथी होतो, एल्प्राजोल सतत घेतल्याने कमजोरी येणे, आत्महत्येचा विचार येणे ही लक्षणे दिसतात. डिस्प्रीनच्या सातत्यामुळे गॅस्ट्रायसिस किंवा किडनी फेल होऊ शकते. स्टेरॉईडमुळे स्नायू आणि हाडे कमजोर होतात, तर सिट्रीजीन एविल या औषधाच्या अतिसेवनाने सुस्ती येणे, सारखी झोप येणे असे प्रकार होऊ शकतात.
Comments
Post a Comment