सुंदर सुविचार
सुविचार................
१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी पार्थना.
३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
५) जे घाईघाईने वर चढू पाहतात
ते कोसळतात.
६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, पेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
१८) जीवन हा एक पाण्याचा पवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसयाला सांभाळत न्यावं लागतं.
२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.
२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
२२) खोटी टीका करू नका, नाहीतर पतिटीका ऐकावी लागेल.
2३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करने कधी चुकवत नाही की फसवत नाही.
२५) ह्रदयात अपार पेम असंल की सर्वत्र मित्र
२६) टीका करणाया शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाया मित्रांपासून सावध रहा.
२७) पसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
३२) शत्रूशीही पेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
३५) दुसयाचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ।।
४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रिनष्ठा निर्माण करायला हवी.
४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
४४) असंभवनीय गोष्टी कधीच खया मानू नयेत.
४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
४७) जे दुसयाचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
४८) पुस्तकाइतका पांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
४९) मनाला आंनद, संस्कार देणारी पत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
५१) आकाशाखाली झोपणायाला कोण लुटणार ?
५२) जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
५३) पिंजयात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
५४) आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
५५) अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
५६) मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
५७) नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
५८) अंतर्बाह्य पांजळपणा हाच पीतीचा पाण होय.
५९) सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
६०) शहाणपणाचे पदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
६१) गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
६२) दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
६३) पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
६४) पुढे मिळणाया आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
६५) स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणायांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
६६) अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
६७) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
६८) स्वधर्माविषयी पेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
६९) अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
७०) क्रोध माणसाला पशू बनवतो.
७१) आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
७२) आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
७३) जे नंतर चांगले
वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
७४) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून पील्यास तो कमी कडू लागतो.
७५) परमेश्वर खरया भावनेलाच साहाय्य करतो.
७६) भरणाया जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
७७) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
७८) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
७९) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
८०) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
८१) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
८२) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
८३) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
८४) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
८५) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
८६) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
८७) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
८८) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
८९) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
९०) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
९१) आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
९२) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
९३) अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
९४) तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसयाचे मित्र बना .
९५) न मागता देतो तोच खरा दानी.
९६) चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
९७) केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
९८) समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
९९) भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
१००) दुसयाला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
Comments
Post a Comment