Posts

Showing posts from 2025

जीवन कौशल्ये शिक्षण

जीवन कौशल्ये शिक्षण जागतिक आरोग्य संघटनेची एकूण 10 जीवन कौशल्य आहेत. जीवनाच्या वाढ व विकास यांच्या महामार्गावर, प्रगतीवर जाताना प्रत्येक विदयार्थ्यांच्या क्षमतांचा योग्य विकास होणे अपेक्षित असते. त्यामुळे जीवन आनंददायी आरोग्यदायी आणि यशस्वी होऊ शकते. विदयार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्ये सुसंगतपणे विकसित केली जावीत, त्यामुळे त्याला प्रभावीपणे व कुशलतेने जीवन ज येईल. अध्ययनकर्त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून दयाव्यात की ज्यामुळे अध्ययनकर्ते ही कौशल्ये सहजगत्या शकतील, ग्रहण करतील म्हणूनच व्यक्तींच्या स्वतःच्या मानसिक व शारीरिक सर्वोत्कृष्ट क्षमतांचा वापर करून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९९७ मध्ये दहा मूलभूत जीवन कौशल्ये सांगितली आहेत. जीवन कौशल्ये म्हणजे अशी कौशल्ये की ज्याद्वारे व्यक्ती आपली शक्ती व क्षमतांचा वापर करून दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडविते व सकारात्मकपणे आपल्या दैनंदिन गरज प्रभावीपणे पूर्ण करते. जीवन कौशल्ये १) 'स्व' ची जाणीव (Self Awarness) २) समानुभूती (Empathy) ३) समस्या निराकरण ...