Posts

Showing posts from 2023

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत..

Image
पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत म्हणून सरकारचे विशेष अभिनंदन...... 🪷श्री. अमायी महालिंगा नाईक🪷 केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता. पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा... मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली.  ...

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता  तेव्हा काय होते? १) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो. २) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो. ४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. ५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते. ६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते. ७) आई वडीलांची किंमत कळायला लागते. ८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. ९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात. १०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते. ११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते. १२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते. १३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होत...