सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे

*सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे*.                           सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर पुढीलप्रमाणे फायदे मिळतात.                             *ग्रॅच्युइटी*.                           .       सेवानिवृत्ती, कमीत कमी ५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर दिलेला राजीनामा, सेवेमध्ये असताना मृत्यू झाल्यास,सेवेमध्ये असताना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा आजारामुळे नोकरीवरून कमी केल्यास , आस्थापनेकडून दिली जाणारी भेट किंवा बक्षिस याला *ग्रॅच्युइटी* असे म्हणतात.  ही ग्रॅच्युइटी सरकारी तसेच खाजगी कंपन्या,आस्थापना यामध्ये सेवा करणाऱ्या कामगारांना देखील मिळते. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा त्या त्या  आस्थापना ठरवितात. ६ व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा १०लाख रूपये असून,७ व्या वेतन आयोगानुसार ही मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली चालू आहेत.                                        .          *ग्रॅच्युइटी किती मिळते?*.                       एकूण सेवा कालावधीची पूर्ण वर्ष.त्या प्रत्येक वर्षाला १५ दिवसांचा , निवृत्तीच्या शेवटच्या महिन्याला मिळणारा पगार.पगारामध्ये मूळ वेतन+ग्रेड पे+ महागाई भत्ता यांचा समावेश होतो. उदा. एकूण सेवा ३०वर्षे.शेवटच्या महिन्यांचा पगार- मूळ वेतन -२०४००.+ ग्रेड पे- २८००.+महागाई भत्ता १४२% -- ३२९४४. म्हणजेच , २०४००+२८००+३२९४४ =५६१४४.                 या पगाराचा १५ दिवसांचा म्हणजे अर्धा  पगार=.  ५६१४४÷२=२८०७२.  याला ३० गुणल्यास(एकूण सेवा कालावधी) =२८०७०×३०=८,१२,१६०/-एवढी ग्रॅच्युइटी मिळेल.                                          .      *प्राव्हिडंट फंड* किंवा *भविष्य निर्वाह निधी*.             ‌. ‌‌.                            कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कापून जाणारी प्राव्हिडंट फंडाची रक्कम, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजासह सेवानिवृत्ती पर्यंत जेवढी रक्कम जमा होते.(२००८नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांची १२% व आस्थापना कडूनही १२%रक्कम दरमहा जमा होते) .ती सर्व रक्कम सेवानिवृत्तीनंतर ताबडतोब कर्मचाऱ्याला , किंवा सेवेमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दिली जाते.                                                     *निवृत्तीवेतन* किंवा *पेन्शन*                                ज्या सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्राव्हिडंट फंडांमध्ये आस्थपनाकडून कोणतीही रक्कम जमा केली जात नाही.त्यांच्या वेतनातून कापून गेलेलीच रक्कम व्याजासह त्यांना निवृत्तीनंतर मिळते.त्या कर्मचाऱ्यांना (सरकारी/निमसरकारी) सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे वेतन यालाच *पेन्शन* किंवा *निवृत्तीवेतन* असे म्हणतात.१००% निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कमीत कमी २० वर्षे सेवा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे.त्यापेक्षा कमी सेवा झाल्यास टक्केवारी नुसार निवृत्तीवेतन कमी होते. ६व्या वेतन आयोगानुसार शेवटच्या महिन्याच्या वेतनावर निवृत्तीवेतन काढले जाते.यामध्ये मूळ वेतन,ग्रेड पे, महागाई भत्ता यांचा समावेश होतो.                                       शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन - २०४००+ ग्रेड पे - २८००= २३२०० .÷ २ (अर्धे वेतन) = ११६०० हे मूळ निवृत्तीवेतन.याच्यावर निर्देशांकानुसार वेळोवेळी लागू असलेला महागाई भत्ता.=१४२ %.म्हणजेच,११६००+१६४७२=२८०७२. हे झाले निवृत्तीवेतन.यामध्ये वेळोवेळी वाढ होत जाते.  (कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला ५०% निवृत्तीवेतन तहहयात मिळत राहते.)                               *रजेचे रोखीकरण (रजेचा पगार)*.                         ५वर्षापेक्षा जास्त  सेवा संपल्यानंतर (कोणत्याही कारणाने) रजा खाते शिल्लक असलेल्या अर्जित रजा (कमाल मर्यादा ३०० ) व अर्धवेतनी (सिक) रजेच्या
शिल्लक रजेच्या १/२ रजा.(याला कमाल मर्यादा नाही). या दोन्ही रजेचे शेवटच्या महिन्याला घेतलेल्या वेतनाएवढ्या  (मूळ वेतन,ग्रेड पे व महागाई भत्ता ) दराने रोखीकरण करून येणारी रक्कम ही त्या रजेचा पगार असतो. कोणत्याही प्रकारे ५ वर्षापेक्षा जास्त सेवा संपल्यानंतर ही रक्कम मिळते.                                     .  *४०% पेन्शन आगाऊ(अॅडव्हान्स)*.                 नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अनुज्ञेय असलेल्या मूळ निवृत्तीवेतनाची ४०% रक्कम,  (पूर्वी ही रक्कम १/३ होती) एकूण १० वर्षाचे परिगणन करून, एकरकमी आगाऊ दिली जाते .तेवढी रक्कम दरमहाच्या निवृत्तीवेतनातून कमी करून निवृत्तीवेतन दिले जाते. सतत १५ वर्षे निवृत्तीवेतन घेतल्यानंतर जीवित असल्यास , हे ४०% कापलेले मूळ निवृत्तीवेतन पुन्हा वेतनात वर्ग केले जाते. पूर्ण निवृत्तीवेतन (फुल पेन्शन) चालू होते.                                           (यामध्ये  काही बदल झालेले असू शकतात.चूकभूल द्यावी घ्यावी.).                                     .

Comments

  1. The nmrc syllabus 2019 pdf is now availble on the website. So all the aspirants can now download it easily.
    All the NMRC aspirants who are preparing for the exam can now download the syllabus in PDF format from the official website too.
    Thanks.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक ब्लॉग्ज,वेब साईट्सची माहिती

नमुना इंग्रजी परिपाठ